होळी आठवली की मला माझं लहानपण आठवतं. माझं गाव आठवतं नि होळीची मजाही आठवते. गावात मध्यावर आमचं दुकान. या दुकानाच्या समोरचा रस्ता खालच्या आळीकडे जाणारा. या रस्त्याच्या तोंडावरच आमची होळी असायची. गावात होळीची मजा दिवाळीपेक्षाही जास्त असायची. कारण फटाके ... अधिक वाचा...
|
जन्माष्ठमीला मुंबईतील लालबाग भागात अगदी साधारण वस्तीत दादांचा जन्म झाला. लहानपणी त्यांना कृष्णा या नावाने हाक मारली जायची. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे आजूबाजूचं वातावरणही परिस्थितीला साजेल असेच होते. भांडणं, हाणामार्या या नित्याच्या ... अधिक वाचा...
|
महाराष्ट्रात रहात असल्याचा आपल्याला अभिमान असणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्राची संस्कृती, तिथली परंपरा, तिथली प्रगती, सुव्यवस्था, (पैसे खाल्ले जात असलं तरी) जपलं जाणारं कायद्याचं राज्य वगैरे वगैरे आपल्या अभिमानाची ठळक स्थळं असतात. ही सगळी अभिमानस्थळं किती ... अधिक वाचा...
|
यशाला सीमा असते, अधःपाताला मात्र सीमा नसते, हे भारतीय हॉकी संघाने दाखवून दिले आहे. ऑलिंपिक पात्रता फेरीच्या सामन्यात बाद होऊन भारतीय हॉकी संघाने देशाची लाज काढली आहे. नामुष्की हा शब्दही इथे थिटा पडतो. कारण हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, हे कोणत्या ... अधिक वाचा...
|
मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे, अशी भीती गेल्या अनेक वर्षांपासून वाटते आहे. पण हे फक्त शहरी लोकांना वाटते आहे. कारण शहरात मराठीचं स्वतंत्र रूप नाहीसं होतं आहे. इंग्रजीच्या अतिवापराने ती भ्रष्ट होते आहे. मात्र, खेड्यात मराठी मूळ आणि शुद्ध स्वरूपात टिकून ... अधिक वाचा...
|
भारतात इंग्रज अंमल प्रस्थापित झाल्यानंतर मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास, गड, किल्ले, समाध्या आणि पुतळे उपेक्षेच्या गर्तेत कोसळले. संस्थानिक, जमीनदार, वतनदार आणि मनसबदारांनी इंग्रजांची तळी उचलून धरायला सुरवात केली आणि महाराष्ट्राला स्वाभिमानाचा म्हणून काही ... अधिक वाचा...
|
राज ठाकरे यांच्या अटकेनंतर आंदोलनाचा केंद्रबिंदू मुंबईतून सरकून महाराष्ट्रभर पसरला. त्यामुळे आधी अटकेच्या अफवेमुळे आणि त्यानंतर खरोखरच्या अटकेनंतर हिंसाचारी आंदोलनकांनी महाराष्ट्रभर धुडगूस घातला. त्यांच्या या दांडगाईचा पहिला बळीही शेवटी एक मराठी माणूसच ... अधिक वाचा...
|
मुंबईत उत्तर भारतीय लोकांविरूद्ध ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले ते पाहता, परप्रांतीयांना विरोधापेक्षा मराठी माणसाचा न्यूनगंडच जास्त दिसून आला. किंबहूना न्यूनगंडातूनच हे आंदोलन उभारले गेले असे वाटते. मराठी लोकांची प्रगती ही ... अधिक वाचा...
|
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे व समाजवादी पक्षाच्या नेत्यांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला शाब्दिक वितंडवाद रविवारी रस्त्यावर आला आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. अर्थात सुरवात राज यांनीच केली होती. पण रविवारी ... अधिक वाचा...
|
मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे अविभाज्य घटक आहेत. यंदाचे साहित्य संमेलनही त्याला अपवाद ठरले नाही. यंदाच्या संमेलनात सुरवातीला राजन खान, वसंत आबाजी डहाके, द. ता. भोसले, म. द. हातकणंगलेकर व मीना कर्णिक हे उमेदवार होते. उमेदवारी जाहीर होऊन प्रचाराला सुरवात ... अधिक वाचा...
|
भारत आज जगाचा मुकूटमणी बनला आहे. भारतीय बुद्धिमत्ता जगावर अधिराज्य गाजवते आहे. भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्मिकता यांचा मोह जगभरातील लोकांना पडला आहे. भारतीय उद्योगांनी जग पादाक्रांत करायची मोहीम सुरू केली आहे. सॉफ्टवेअरपासून व्यापारापर्यंत आणि खेळापासून ... अधिक वाचा...
|
काहींची नावे खऱोखरच त्यांना किती शोभतात. बेनझीर हे नावही असेच. बेनझीर या शब्दाचा अर्थ आहे, अतुलनीय. जिच्याशी तुलनाच होऊ शकणार नाही अशी. बेनझीरला हे किती लागू होतंय नाही? जेथे बुरखा काढणेही पाप असे समजल्या जाणाऱ्या अत्यंत कट्टरवादी मुस्लिम देशाची ती ... अधिक वाचा...
|
लोक जगण्यासाठी खातात, पण इंदूरचे लोक खाण्यासाठी जगतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इंदुरच्या खवय्येपणाचे किस्से सर्वदूर पसरले आहेत आणि या किश्श्यांत कणभरही अतिशयोक्ती नाही हे इथे आल्या आल्या कळतं. त्याचबरोबर खाणं हे वेळेशी बांधील नाही. त्यामुळे खायचं केव्हा हा प्रश्न पडायचं (किमान इंदूरमध्ये आल्यानंतर तरी) कारण नाही. अधिक वाचा...
|
अस्मादिकांचे वास्तव्य सध्या इंदूर शहरात आहे. काही गावांची नाव उच्चारली तरी अंगावर रोमांच उमटतात. ग्वाल्हेर, इंदूर, अटक, पानिपत ही गावं त्यापैकीच. कारण या गावांना इतिहासाचा स्पर्श आहे. उत्तर दिग्विजय करायला निघालेल्या मराठ्यांच्या फौजांनी नर्मदापार झेप ... अधिक वाचा...
|
कामावरून परतल्यानंतर मी जेवायलाच बसलो होतो. तेवढ्याच डॉलीने आठवा सूर लावला.
ओ रे बाळा ओ. काय झालं. कुणी मारलं का माझ्या बाळाला? मी तिला गोंजारत विचारलं.
बाबा, मला स्कूटर पायजे. हुंदके देत डॉली म्हणाली. अधिक वाचा...
|